इटलीच्या रस्त्यावर डिम्पल कपाडियाचा डान्स!

डिम्पल कपाडिया सध्या अक्षय कुमारच्या कुटुंबासोबत इटलीत सुट्टीचा आनंद घेत आहेत. इटलीतील एका छोट्याशा खेड्यात दुपारचीच वेळ. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्युझिशियनने त्याच्या वाद्यावर ‘बॉबी’ या चित्रपटातील एका गाण्याची धून छेडली आणि डिम्पल कपाडिया स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. सगळे काही विसरून त्याही थिरकायला लागल्या. अक्षय कुमारने हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

-Ads-

गेल्या चार दशकांपासून “बॉबी’ या लव्ह स्टोरीची जादू कायम आहे. हिरो म्हणून ऋषी कपूरचा हा पहिला सिनेमा होता. भारतीय सिनेमाचे शो मॅन राजकपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमामध्ये बॉबी डिम्पल पहिल्यांदा षोडषवर्षीय नायिकेच्या रूपात दिसली होती. तिच्या केसांच्या बटांना लागलेले पीठ कोणीही विसरू शकणार नाही. किशोरवयीन प्रेमाला गरीब श्रीमंतीच्या संघर्षाची किनार आणि त्यातून या प्रेमी युगुलाने केले बंड अशी सरधोपट कथा असलेल्या “बॉबी’ने नंतर अशा कथांचा ट्रेंडच सुरू केला होता. त्यातील श्रवणीय गाणी आणि प्राण, राजनाथ, नादिरा यासारख्या कसलेल्या कलाकारांच्या भूमिकांची जोड होती. याची याद इटलीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा ताजी झाली आणि डिम्पल स्वतःला रोखूच शकल्या नाहीत. “बॉबी’ च्या यशानंतर डिंपल यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या होत्या. पण, त्यांनी सर्व ऑफर्स नाकारत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

अगदी अलिकडे म्हणजे “दिल चाहता है’मध्ये अक्षय खन्ना सोबतची एक रोमॅंटिक आणि तशीच समंजस भूमिका डिम्पलनी साकारली होती. कन्या ट्विंकल आणि जावई अक्षय कुमारच्या फिल्मी करिअरला साक्षीदार असलेल्या डिम्पलना आपल्या काळातील सुपरहिट सिनेमाचे चाहते इटलीसारख्या विदेशातही असल्याचे बघून नक्कीच अत्यानंद झाला असणार. अक्षयने अलीकडेच “हाऊसफुल्ल 4’चे शूटिंग नुकतेच संपवले आहे. तर डिम्पल “ब्रम्हास्त्र’मध्ये दिसणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)