इजिप्तमध्ये घातपाताचा कट उधळला…

14 दहशतवाद्यांचा खात्मा

कैरो – इजिप्तमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याचा दावा लष्कराने केला आहे. मध्यवर्ती सिनाई प्रांतामध्ये लष्कराच्या तळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने केलेल्या कारवाईदरम्यान 14 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचे 8 सैनिकही मारले गेले आहे. याशिवाय 15 सैनिक जखमीही झाले आहेत, असे लष्कराचे प्रवक्‍ते तामेर एल राफेई यांनी अल अहराम वृत्तसंस्थेला सांगितले.

इजिप्तमध्ये सध्या “ऑपरेशन सिनाई 2018′ ही दहशतवाद विरोधी मोहिम राबवली जात आहे. मध्य आणि उत्तर सिनाई प्रांताबरोबर नाईल डेल्टा आणि नाईल खोऱ्याच्या अन्य भागातील दहशतवादी गट आणि गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी ही मोहिम सक्रिय आहे. या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी छापे घातले जात आहेत. या मोहिमेविरोधात दहशतवाद्यांकडूनही घातपाती कारवाया केल्या जात आहेत. ठार झालेले सर्व 14 दहशतवादी हे आत्मघातकी जॅकेट घातलेले होते आणि त्यांच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रे होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)