इजिप्तमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूकीसाठी मतदान

कैरो – इजिप्तमध्ये अध्यक्षांच्या निवडीसाठी आज मतदान पार पडले. अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांच्या विरोधात घाड पार्टीचे प्रमुख मौसा मुस्तफा मौसा हे निवडणूकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. अनेक ठिकाणी अध्यक्ष सिसी यांची मोठी कटआऊट आणि फोटो उभारले गेले आहेत. त्यांच्या समर्थकांनी “लॉंग लीव्ह इजिप्त’च्या घोषणा देऊन वातावरण सिसीमय करून टाकले आहे. या निवडणूकीमध्ये सिसी यांना विशेष मोठा विरोध होणार नसल्याचे भाकित यापूर्वीच वर्तवण्यात आले होते. सिसी यांनी हेलिओपोलिस येथे स्वतः मतदानाचा हक्क बजावला.

इजिप्तचे पंतप्रधान शेरीफ इस्माईल आणि अन्य मंत्री. न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांनीही मतदानाच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये मतदान केले.

इजिप्तमधील लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची सत्ता उलथवून सिसी हे 2014 मध्ये अध्यक्ष झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी मौसा मुस्तफा मौसा हे देखील सिसी यांचेच समर्थक आहेत. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मतदानाचा निकाल 2 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

आजच्या मतदानासाठी सुमारे 60 दशलक्ष नागरिक पात्र ठरले आहेत. दहशतवाद्यांनी वारंवार हल्ले केल्यामुळे इजिप्तमध्ये काही काळ अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच इजिप्तच्या अर्थव्यवस्थेसमोरही मोठे संकट उभे राहिले होते. मात्र आता इजिप्तमध्ये शांतता असेल, असे पंतप्रधान शेरीफ यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)