मुंबई : इचलकरंजी शहरासाठी शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या वारणा पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन करून समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले की, इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेसंदर्भात समाधानकारक तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात येईल. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी या समितीसमोर योजनेचे सादरीकरण करतील. त्यानंतर दोन्ही बाजू ऐकून व मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)