इचलकरंजीत चौथ्या मजल्यावरुन पडून मुलाचा मृत्यू

कोल्हापूर  (प्रतिनिधी) – तोल जाऊन चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे जखमी झालेल्या एका चौदा वर्षीय मुलाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना येथे आज घडली. एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात तो शिकत होता. त्याच्या पश्‍चात बहिण, आई-वडिल असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभय उदय वाळवेकर (वय 14, रा. खंजिरे मळा) असे या शाळकरी मुलाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचे वडिल उदय वाळवेकर यांचा तंबाखूचा व्यापार असून ते शहरातील मोबाईलचे मोठे वितरक आहेत. त्यांना अभय व एक मुलगी असून खंजिरे मळा येथे त्यांचा मोठा बंगला आहे. तळघरात गोडावून तर दुसऱ्या मजल्यावर ते राहण्यास आहेत. तिसऱ्या मजल्यावर अभयची स्वतंत्र खोली आहे. गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास अभय आपल्या खोलीत होता. मात्र, उशिरापर्यंत अभय खाली न आल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला हाक दिली. मात्र, कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तो बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे निदर्शनास आले. जखमी अवस्थेत त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत अभयच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. सकाळपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, रक्तदाब कमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)