इचलकरंजीत एक कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

कोल्हापूर – एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी रामकृष्ण रामप्रताप बाहेतीयांचे अपहरण करण्याचा धक्‍कादायक प्रकार येथे घडला. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे.

पेठवडगाव रस्त्यावर हातकणंगले पोलिसांची गस्तीची गाडी पाहून अपहरणकर्त्यांनी बाहेती यांना तिथेच सोडून धूम ठोकली. या पाच जणांनी बाहेती यांच्याकडून 3 तोळ्यांचे चेन, 2 तोळ्यांची अंगठी व 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सुमारे 1 लाख 70 हजारांचा ऐवज काढून घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)