इक्‍बाल कासकर रूग्णालयात…

मुंबई – कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ इक्‍बाल कासकर याला काल जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या ठाणे कारागृहात आहे. तुरूंग अधिकाऱ्यांनी त्याला काल रात्री सव्वादहा वाजता जेजे मध्ये दाखल केले. त्याची प्रकृती सध्या स्थीर आहे असे रूग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

कासकरला गेल्या सप्टेंबर महिन्यात खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून तो कारागृहात आहे. तो मुंबईतील दाऊदचा बांधकाम व्यवसाय सांभाळतो आहे. सन 2003 साली त्याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्यावर अन्यही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या प्रकृतीच्या विस्तृत चाचण्या करून तपासणी केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)