इकोफ्रेंडली आकाश कंदीलांची 30 वर्षांची परंपरा

(गुरूनाथ जाधव)
सातारा- पर्यावरण रक्षणासाठी गेले 30 वर्षे इकोफ्रेंडली आकाश कंदील बनविण्याची परंपरा अजित मधुसूदन वाकनिस यांनी जपली आहे. सातारा येथील व्यंकटपूरा पेठेतील गणकेश्वर मंदिरा शेजारी ते राहतात.पर्यावरण पूरक आकाश कंदीलाच्या कल्पनेला प्रतिसादही मिणत आहे.

प्लॅस्टिक बंदीच्या काळामध्ये पारंपारिक पध्दतीने बाबुंच्या कामट्या, दोरा,कागद, यांचा वापर करून विविध प्रकारच्या आकारामध्ये आकाश कंदील बनविण्याचे काम वाकनिस कुटुंबिय अनेक वर्षे करत आहेत. गणेश विसर्जनानंतर आकाश कंदील बनविण्याच्या कामाला ते सुरूवात करतात. मधुसूदन वाकनिस अजित वाकनिस यांचे वडिल त्यांनी आकाश कंदील बनविण्याची कला मुलाला शिकवली.कौशल्य, जिद्द, चिकाटी, एकाग्रता, कलात्मकता या गुणांचा अंगीकार करत आकर्षक पध्दतीनं आकाश कंदील बनवू लागलो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांना ते आवडू लागले आणि त्यामुळे या हंगामी व्यवसायाची सुरूवात झाली असे वाकनिस सांगतात. 100 रूपयांपासून ते 500 रूपयापर्यंतचे हव्या ता आकारात आकाशकंदील घरच्या घरी बनविण्याचे काम अजित करत आहेत. यासाठी लागणारे बांबू विकत आणणे, त्याच्या सुयोग्य आकारात कामट्या कापणे, दोऱ्याच्या सहाय्याने त्यांचा सांगाडा बांधणे. त्यावर रंगीत चिरमुरे कागद आकर्षक पध्दतीने कापून तो सफाईदारणे चिकटवण्याचे काम केले जाते. यामध्ये मोठा मुलगा ऋषीकेश, व छोटा मुलगा ओंकार तसेच पत्नी अमृता यांचे मोलाचे सहकार्य मिळते. आकाश कंदील बनविण्यासाठी वेळ, आणि कौशल्याची आवश्‍यकता आहे. ही कला आहे व याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक शिबिरे देखील मी घेत असतो ज्यामधून महिला, युवकांना या व्यवसायाचे तंत्र माहिती होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)