गेले काही दिवस आपली फिल्म ‘स्त्री’मूळे चर्चेत राहिलेली आशिकी गर्ल श्रध्दा कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, इंस्टाग्राम वर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी बनलेली आहे. असं पहिल्यांदा झालं असेल की, श्रद्धाने आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण सारख्या मात्तब्बर अभिनेत्रींना पाठीमागे टाकतं इंस्टाग्रामवर नंबर वन स्थान पटकावण्यात यश मिळवलं आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

इंस्टाग्रामवर श्रद्धा १०० गुणांसह सर्वश्रेष्ठ बनली आहे. तर अलिया भट्ट ८५ गुणांसह  दूस-या स्थानावर पोहोचली आहे. दीपिका पादुकोण ६८ गुणांमूळे तिस-या पदी तर प्रियंका चोप्रा ६६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. सोनम कपूर आहुजा ५९ गुणांसह  पाचव्या स्थानावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “एका महिन्याच्या आत सातव्या स्थानावरून सरळ अग्रस्थानी पोहोचलेल्या श्रद्धाने आपल्या बॉलीवूडमधल्या सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. तिची वाटचाल नक्कीच उल्लेखनीय म्हणायला हवी. राजकुमार राव सोबतची फिल्म स्त्री आणि शाहिद कपूर सोबतची फिल्म ‘बत्ती गुल मीटर चालू’मूळे तिची बरीच पब्लिसिटी होते आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)