इंधन नसल्याने सहा बसेस तीन तास बंद

गोंदवले – माण तालुक्‍यातील दहिवडी आगारात सावळा गोंधळ सुरू असून रद्द होणाऱ्या एसटी फेऱ्याप्रमाणे अधिकारीसुध्दा गायब होत आहेत. इंधन नसल्याने सहा गाड्या तीन तास बंद ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. सातारा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालून हा कारभार सुधारावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
दहिवडी आगार माण तालुक्‍यातील मुख्य आगार आता नावालाच उरल्याची स्थिती आहे. आगारात अनेक बाबींची कमतरता असून उपाययोजना केल्या जात नाहीत. दोन दिवसांपूर्वी सहा गाड्या केवळ इंधन नसल्याने तीन तास एकाच जागी उभ्या होत्या. त्यामुळे सहा फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली.

आगारात चौदा गाड्या नादुरुस्त असून त्यामुळे इतर फेऱ्यांवर ताण येत आहे. सकाळी शाळा आणि महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना व सातारा-पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. सकाळी सातपासून साडे नऊपर्यंत सहाय्यक वाहतूक नियंत्रण कक्ष रिकामाच होता. आगार प्रमुखदेखील कार्यालयात नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांनी चौकशी कोणाकडे करायची अशा प्रश्‍न निर्माण झाला.

पुसेगावमधील सेवागिरी यात्रेसाठी फेऱ्यांचे नियोजन गरजेचे असताना आजअखेर कसलेही नियोजन दिसत नाही. यामुळे खासगी प्रवाशी वाहतुक व्यवसायिक आगाराच्या आवारात जावून प्रवाशांना घेऊन जात होते. अचानक फेऱ्या रद्द झाल्याबाबत प्रवाशांनी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांचे फोन बंद होते. अनेक गाड्या वेळ सोडून धावत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमार झाली. सातारा विभागीय अधिकारी यांनी या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी माण तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष दिपकराव तंडे बडवे यांनी केली आहे. सातारा आगारात देखील हीच परिस्थिती दिसून येते.

वेगवेगळ्या गावांच्या महत्वाच्या फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. यामुळे नोकरवर्ग, विद्यार्थ्यी यांचे नुकसान होत आहे. योग्य नियोजनाचा अभाव, चालक व वाहकांची फेरे बुडवा-बुडवी याचा फटका प्रवाशांना होत आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशनकडून आलेला डिझेल टॅंकर नियमितपेक्षा कमी इंधन घेवून आल्याने तो परत केला व दुसरा टॅंकर मागवून घेतला. यामुळे फेरे अनियमित झाले आहेत अशी माहिती आगार प्रमख मोनाली पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)