इंधन दर दररोज बदलण्याला आव्हान देणारी याचिका दाखल 

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलण्याला आव्हान देणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर उद्या (बुधवार) सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेला महत्व आहे.
दिल्लीच्या रहिवासी पूजा महाजन यांनी संबंधित याचिका सादर केली आहे. पेट्रोल आणि डिझेलला अत्यावश्‍यक वस्तू मानण्यात यावे. त्या इंधनांचे रास्त दर निश्‍चित करावेत, असा आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सरकारने सार्वजनिक कंपन्यांना त्यांच्या मर्जीनुसार इंधन दर वाढवण्याची अप्रत्यक्ष संमती दिली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आरोपाच्या पुष्टीसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी तब्बल 22 दिवस इंधन दरांमध्ये बदल करण्यात आला नव्हता, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा संबंध जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनांच्या दरांशी जोडून सरकार दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहे. आतापेक्षा कच्च्या इंधनांचे दर कमी असताना पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले नव्हते, असेही याचिकेत निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)