इंधन दरात पुन्हा कपात 

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असल्याने देशात इंधन दरात कपात होताना दिसत आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात 16 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 13 पैशांची कपात करण्यात आली आहे. या दरकपातीमुळे जनतेला थोडासा दिलासा मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 83.24, तर डिझेल 75.93 पैसे प्रति लिटर दराने मिळेल.

गेल्या महिन्यात इंधनाचे दर शंभरीच्या घरात पोहोचले होते. त्यावेळी देशभरातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. जनतेचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारने राज्य सरकारांना कर कमी करण्याची विनंती केली होती. त्याला विविध राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीनुसार देशातील इंधन दरात सातत्याने घट होताना दिसत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)