इंधन दरवाढ सुरुच

पेट्रोल 18, तर डिझेल 31 पैशांनी महाग
नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने अडीच रुपयांचा दिलासा दिला. मात्र त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल 18 पैसे आणि डिझेल 31 पैसे महाग झाले आहे. मुंबईत आता पेट्रोलसाठी 88 रुपये 12 पैसे, तर डिझेलसाठी 78 रुपये 82 पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलचे पुन्हा एकदा नव्वदीचा आकडा पार जाण्याची शक्‍यता आहे.

आठवडा भरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींचे दर लिटरमागे अडीच रुपये कमी केल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ सुरुच असल्याने पुन्हा एकदा पेट्रोल प्रति लिटर नव्वदीचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. याआधी 11 ऑक्‍टोबरला पेट्रोल 9 पैसे तर डिझेल 30 पैसे महागले होते. आज आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 88 रुपयांवर तर डिझेलचे दर 78 रुपयांच्या वर गेल्याचे दिसून येते आहे.

-Ads-

मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 88 रुपयांवर गेला आहे. मात्र शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर 80 ते 81 रुपये प्रति लिटर असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे. दिल्लीत पेट्रोलसाठी प्रति लिटर 82 रुपये 66 पैसे मोजावे लागणार आहेत. तर डिझेलचा दर प्रति लिटर 75 रुपये 19 पैसे झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)