इंधन दरवाढ शतकाच्या उंबरठ्यावर

सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले
अकोले – इंधन दर वाढ शतकाच्या उंबरठ्यावर येवून ठेपल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.ऐन दिवाळी – दसरा सणांच्या काळात ही दर वाढ ‘सेन्चुरी’ पूर्ण करणार काय? असा सवाल सद्या उपस्थित केला जात आहे. ही दरवाढ सद्या पारावर, पान ठेवल्यावर, चहाच्या हॉटेलात सर्वांच्या चर्चेला विषय पुरवून गेली आहे.
आज अकोले या तालुक्‍याच्या गावी व तालुक्‍यात पेट्रोलने नव्वदी पार केली. त्यामुळे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनधारकांबरोबर सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित बिघडले असल्याचा सूर येथे उमटला आहे. त्या खालोखाल डिझेलचे दरही 75 च्या पुढे निघून गेल्याने त्याचेही दरही शतकी वाटचाल करणार असल्याची येथे होरा मांडला जात आहे.
गेले सहा महिने राज्य व केंद्र सरकार या ना त्या स्वरूपात सामान्य माणसाच्या अजेंड्यावर महागाईचा विषय आणीत आहे. त्यात जीवनावश्‍यक असणारा साबण, खाद्यतेल, साखर, खोबरे, डाळी व अन्य वस्तूंचे दर आज जरी महागाईचे दाहक वास्तव जाणवून देत नसले तरी सामान्य मजूर माणसाला एक वेळेचे स्वस्तपूर्ण जेवण मिळवू देणारी स्थिती नाही, असे या घटनांचा अभ्यास करणारे विचारवंत प्राचार्य शांताराम गजे यांनी स्पष्ट केले.
या इंधन दरवाढीमुळे एसटीचे अकोले-संगमनेरच्या प्रवासाचे दर वाढले आहेत असे सांगून सेवा दलाचे महामंत्री विनय सावंत यांनी प्रवाशी बोजा हा सामान्य माणसाला परवडणारा नाही. सामान्य माणसाला इंधन दर वाढीशी देणे घेणे नाही. पण आज “बैल’ संस्कृती गायब होऊन यांत्रिकीकारणाचे जोरदार वारे वाहत असल्याने नांगरणी, दुणनी, पेरणी, अथवा इतर कल्टीवेशन इंधन दरवाढीमुळे कोलमडून पडणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट दर वाढ होणार हे निश्‍चित. त्याचा परिणाम शेतमाल वाहतूक वाढणार.पण त्या मालाचे दर वाढले नाहीत तर मात्र शेतकरी कर्जबाजारी होणार अशी भीती शेतकरी संघटनेचे नेते व तालुका अध्यक्ष शरद देशमुख यांनी व्यक्‍त करताना सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला. राज्य सरकारने अबकारी दरात कपात करून वाहन चालकांबरोबरच सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी केली.
रुपयाचे अवमुल्यन अमेरिकेची इराण, इराक, कतार व अन्य अरबी देशांवरील दहशत व आंतरराष्ट्रीय राजकारण.यामुळे इंधन दर वाढत आहेत. याकडे लक्ष वेधून हेरंब कुलकर्णी म्हणाले, मनमोहन सिंग सरकारच्या काळातही अशी दर वाढ झालेली होती. मात्र ती वाढ 82 रुपयांच्या आसपासच रेंगाळली होती. याची आठवण करून देवून त्यांनी आगामी काळात ही वाढ थांबेल असा विश्‍वास व्यक्‍त केला.
गेली 51 वर्षे पेट्रोल व डिझेल पंप चालक असलेले डॉ. प्रकाश सारडा म्हणाले, आमचा पंप 1967 साली सुरु झाला. तेव्हा पेट्रोल 82 पैसे लिटर होते. तर डिझेल 40 पैसे लिटर होते. त्यात 900 पटीने वाढ झालेली आहे. पण आता पूर्वीचा संदर्भ कुचकामी ठरत असून ही दर वाढ आज तरी कमी होण्याचे चिन्हे वाटत नाहीत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)