इंधन दरवाढ विरोधी राष्ट्रवादीचा आज मोर्चा

रेडा- पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस इंदापूर नगरपालिका ते तहसिलदार कचेरीवर बुधवारी (दि. 30) मोर्चा काढणार असल्याचे इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ केली असून ही दरवाढ रद्द करावी, शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देण्या संदर्भात व शेतीच्या मालाला हमी भाव देतो, अशी घोषणाही सरकारने केलेली होती. ही कोणतीही आश्वासने भाजप सरकारने पाळली नाहीत. सरकारला जाग आणण्यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी युवकचे तालुकाध्यक्ष सचिन सपकळ, विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)