इंधन दरवाढ टाळता येणार नाही- नितीन गडकरी

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सगळीकडून सरकारवर टीकेची झोड उठते आहे. दरम्यान, पेट्रोल व डिझेलसाठी अनुदान दिल्यास कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे पैसे उरणार नाही, असं विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.  एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी हे विधान केले आहे.

इंधन दरवाढीची परिस्थिती टाळता येणार नाही. इंधनाच्या दरांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंध असतो. कंपन्यानी महागड्या दरात इंधन खरेदी करुन ते कमी दरात विकलं तर सरकारला कंपन्यांना अनुदान द्यावे लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले. जर हे अनुदान दिले तर कल्याणकारी योजनांसाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी केल्यानंतर इंधन कंपन्याना अनुदान देण्यासाठी आम्हाला सिंचन योजना, गावातील लोकांना मोफत एलपीजी देणारी उज्ज्वला योजना, ग्रामीण विद्युतीकरण प्रक्रिया, मुद्रा योजना अशा अनेक कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील. आम्ही सध्या 10 कोटी कुटुंबाच्या आरोग्य विमा योजनेवर काम करतो आहे. पिक विमा योजनेवरही काम करत आहे. सरकारकडे मर्यादीत पैसे आहेत. त्यामुळे जर पेट्रोल व डिझेलवर अनुदान दिले तर बजेट कोलमडेल, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले कल्याणकारी यॊजनॆत राष्ट्रपती पासून ते सामान्य आमदार खासदार ह्यांच्या पगारात वाढ करण्याचा समावेश आहे का ? ज्या मोफत यॊजना राबविण्यात येणार आहेत व ज्यावर काम करण्यात येत आहेत ह्या मागण्या सर्वसामान्यांकडून करण्यात आल्या होत्या का ? कि पक्षाला मते मिळण्यासाठी दिलेली मतदारांना दिलेली आश्वासने होती ? १० कोटी कुटुंबाला शुद्ध आहार व पाणी जर वेळच्यावेळी मिळाले ज्यामुळे त्यांची सर्वांगीण शारिरीक व मानसिक संतुलन बिघडणार नाही ह्याची काळजी घेतली तर ह्या विमा यायोजनेची गरज भासेल का ? आज आपल्या देशातील ५५ % जनता अर्धपोटी जीवन जगात आहेत असा आंतरराष्ट्रीय अहवाल वाचण्यात आला विमा यॊजनॆनी ह्यांची पोटे पूर्ण भरतील का ? प्रत्येक आमदार खासदार मंत्री ह्यांनी ह्यापुढे जनसेवेसाठी सरकार कडून एकही पैसे न घेता स्वताहाच्या खिशातून खर्च करण्याची यॊजना का राबविण्यात येत नाही ? त्यांचे दररोजचे नास्ता पाण्याची जेवणाची राहण्याची सोय प्रचारकाप्रमाणे मतदाराच्या घरी करण्याची यॊजना का करण्यात येत नाही ?लालबहाद्दूर शास्त्री ह्यांनी प्रत्येक सोमवारी भात न खाण्याचे जाहीर आव्हाहन केले व ते स्वताही पळत असत अश्या यॊजना का राबविण्यात येत नाहीत ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)