इंधन दरवाढी विरोधात जनजागरण आंदोलन

पिंपरी – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दर कपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग करण्यापेक्षा सरकारने पेट्रोल व डिझेल जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करावे मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 11) शहरात विविध पेट्रोल पंपावर सरकारविरोधी पत्रके वाटून जनजागरण आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या सुरवातीस दापोडीतील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दापोडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, मोशी, चिखली, भोसरी, सांगवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन आंदोलन करण्यात आले.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, सरचिटणीस डॉ. स्नेहल खोब्रागडे, गौरव चौधरी, अनिकेत आरकडे, सिध्दार्थ वानखेडे, अक्रम शेख, विरेंद्र गायकवाड, कुंदन कसबे, सौरभ शिंदे, पिंपरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, संदेश बोर्डे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)