इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा कोल्हापुरात बैलगाडी मोर्चा

कोल्हापूर – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्या वतीने आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी आणि सायकली चालवत मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोर्चात 10 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या तर बुलेटला बैलगाडीत ठेवून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आलाय.

गेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत 19 वेळा वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल 80, तर डिझेलचा दर 70 रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलांवर मोदी सरकार आणि इंधन दरवाढ निषेधाच्या घोषणा लिहिल्या होत्या. मोदी सरकार हाय हाय.. गाजर सरकार हाय हाय…च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)