इंधन दरवाढीमुळे धान्य, फळे, भाजीपाला महागला

सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ ; शेतकऱ्यांनाही फटका

पुणे – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पेट्रोल, डिझेल वाढीमुळे अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्यांच्या किंमतीवर झाला आहे. दरवाढ सुरू झाल्यापासून अन्नधान्यांच्या भावात क्‍विंटलमागे 50 ते 75 रुपयांनी, तर भाजीपाला आणि फळांच्या भावात 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाच बसत आहे.
मार्केट यार्डात शेतकरी टेम्पोने माल विक्रीस आणत असतात. तर मार्केट यार्डातून मालाची खरेदी करून घेऊन जाणाऱ्या किरकोळ व्यापारी टेम्पोतून माल नेत असतो. शेतकरी, किरकोळ व्यापारी या दोघांना टेम्पोचे भाडे द्यावे लागते. कर्नाटक विधानसभा निवडणूक झाल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दररोज वाढ होत आहे. दोन्हींच्या भावात 15 दिवसात 3 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. परिणामी, फळे, भाजीपाल्याच्या भावात सुमारे 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याविषयी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतमालाच्या भावात वाढ झाली आहे. खरेदीदाराला जास्त किंमत देऊन खरेदी करावी लागणार आहे. सध्यस्थितीत वाढलेल्या पेट्रोल, डिझेल भावात वाढ झाल्यामुळे तरकारी, फळ विभागात भाजीपाला आणि फळांच्या दरात 5 ते 10 टक्क्‌यांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल-डिझेल अद्याप जीएसटीमध्ये आलेले नाही. राज्य सरकारने त्याआधीच इंधनावर 9 रुपयांचा अधिभार लावला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दुष्काळी अधिभार या नावाने राज्य सरकार सर्वसामान्यांकडून प्रतिलिटर हा अधिभार वसूल करीत आहे. त्याचा परिणाम इंधन दरावर होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दि पूना मर्चंटस्‌ चेंबरचे सचिव विजय मुथा यांनी डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे धान्य महागल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, मार्केट यार्डात देशाचा काना-कोपऱ्यातून धान्य येत असते. दररोज भुसार बाजारात 250 ते 300 ट्रक येत असतात. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर वाढल्याने अन्नधान्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या वाढलेले डिझेलचे दर, विविध कर आणि जीएसटी मिळून प्रतिकिलोमागे 1 रुपये 20 पैशांनी भाव वाढ झाली आहे. यंदा देशभरात शेतमालाचे चांगले उत्पादन झाले आहे. मात्र, वाढलेल्या महागाईचा फायदा हा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. तर, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात 10 ते 14 मे दरम्यान मार्केटयार्डातील भुसार बाजारात गव्हाचा प्रतिक्विंटलचा दर हा 2 हजार रुपये आणि ज्वारीचा 1900 ते 3 हजार रुपये होता. 14 तारखेनंतर गव्हाच्या प्रतिक्विंटलला दर 2 हजार 125 रुपये आणि ज्वारीचा दर 2 हजार ते 3 हजार 200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. +


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)