इंधन दरवाढीने पीएमपी ब्रेक’डाऊन’

– गणेश राख

महिन्याला 67 लाखांचा फटका : 70 रुपये 37 पैसे प्रती लीटर दराने डिझेल खरेदी

पुणे – पीएमपीच्या ताफ्यातील जुन्या गाड्यांची वाढती संख्या, घटते प्रवासी आणि दुसरीकडे देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढल्याने दरवर्षी तोट्याच्या गर्तेत अधिकाधिक खोल जाणाऱ्या पीएमपीचा पाय गेल्या चार महिन्यांत आणखी खोलात गेला आहे.

मागील चार महिन्यांत डिझेलच्या दरात सुमारे 4 रुपये 15 पैशांनी वाढ झाल्याने पीएमपीला महिन्याला तब्बल 67 लाख 17 हजार 600 रुपये दरवाढीचा भार सोसावा लागत आहे. पीएमपीला सध्या 70 रुपये 37 पैसे प्रती लीटर दराने डिझेल खरेदी करावे लागत असून दरदिवशी सुमारे 38 हजार लीटर डिझेलची खरेदी होते. त्यातच, डिझेलचे दर रोजच वाढत असल्याने पीएमपीकडून तोटा भरून काढण्यासाठी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पीएमपीच्या ताफ्यात 571 बसेस सीएनजीच्या, तर 800 पेक्षा जास्त बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसेससाठी पीएमपीला सुमारे 38 हजार लीटर डिझेल प्रतीदिन खरेदी करावे लागते. पीएमपीला हे डिझेल थेट कंपनीकडून सवलतीच्या दरात मिळत असले तरी, कंपनीकडून 1 मे 2018 पासून सातत्याने डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचा फटका पीएमपी प्रशासनाच्या आर्थिक नियोजनाला बसत असल्याचे चित्र आहे.

महिन्याला 67 लाखांचा फटका
मे 2018 पासून डिझेलच्या दरात जवळपास 4 रुपये 15 पैशांनी वाढ झाल्याने पीएमपीला दररोज सुमारे अडीच लाख रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तर महिन्याला ही रक्कम जवळपास 67 लाख 17 हजार 600 रुपये असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली, त्यात पीएमपीच्या ताफ्यात अनेक बसेस आर्युमान संपलेल्या असल्याने या वाहनांसाठी प्रती किलोमीटर लागणारे डिझेल नवीन गाड्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे एका बाजूला प्रवासी संख्या घटल्याने प्रती किलोमीटर खर्च आणि उत्पन्नाचे गणित गडगडले असतानाच; आता डिझेल दरवाढीने पीएमपीची चांगलीच कोंडी झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून होत असलेल्या डिझेलदरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून जास्तीत जास्त गाड्या मार्गावर आणून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न चालू आहेत. तसेच, चालकांना बस चालवताना कशापद्धतीने इंधनबचत करता येईल, याविषयी तज्ज्ञांकडून माहिती देण्यात देत आहे. इंधनबचतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपी

पीएमपीचा थोडक्‍यात आढावा –
– डिझेलवर चालणाऱ्या बसेस – 800
– रोज लागणारे डिझेल – 38 हजार लिटर
– डिझेलसाठी रोज लागणारे पैसे – 26 लाख 74 हजार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
6 :heart:
5 :joy:
3 :heart_eyes:
4 :blush:
21 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)