संग्रहित छायाचित्र
पुणे: महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढू लागले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष चेतन तुपे व खा.वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच पेट्रोल पंपावर नागरिकांना काळ्या कमळाची प्रतिकृती देऊन दरवाढीचा आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असल्याचा आरोप पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने  केला. इंधन दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्ष कार्यालयापासून स्वारगेट चौकातील पेट्रोलपंपापर्यंत अनोखी रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी प्रधानसेवकाणी जनतेला सांगितले होते की महागाई कमी झाली नाही तर मला कोणत्याही चौकात बोलवुन जी शिक्षा द्याल ती मान्य आहे याची आठवण करुन देउन त्यांनी स्वारगेट च्या जेधे चौकात येण्याची आम्ही पुणेकर वाट पाहत आहोत असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले, तसेच पेट्रोल व डिझेल याबरोबर सि एन जी गॅस ची पण दरवाढ झाल्यामुळे रिक्षा चालक व टेंपोचालक हे हैराण झाले आहेत याकडे लक्ष वेधले. खासदार वंदना चव्हाण यांनी २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने देउन खोटी स्वप्ने दाखवुन सत्ता हस्तगत केली त्यावेळी इंधना मध्ये थोडी दरवाढ झाली तर आताचे मंत्री लगेच रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचे परंतु आज त्यांचेच सरकार प्रचंड महागाई वाढवत देखील आज हे मंत्री गप्प का हेत असा सवाल त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)