इंधन दरवाढीचा कॉंग्रेसकडून निषेध

चिंचवड – मोदी सरकार देशात आल्यापासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतीचा भडका उडाला आहे. कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असतानाही भाजप सरकारने पेट्रोल व डिझेल स्वस्त केले नाही. त्यामुळे जनतेला इंधनाच्या महागाईला तोंड द्यावे लागत आहे. सुवर्ण अक्षराने लिहावे असे पेट्रोल व डिझेलचे दर सरकारने जनतेवर लादले असून त्याचा निषेध करत असल्याचे चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेश नवले यांनी म्हटले आहे.

आज पेट्रोल 85.40 आहे. डिझेल 72 रूपये आहे. आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर निम्म्याहून कमी झाले होते. तेव्हा तो फायदा सामान्य ग्राहकापर्यंत पोहचवला नाही. आता मात्र आंतरराष्ट्रीय दराची मखलाशी केली जात आहे. 60 वर्षात पेट्रोल व डिझेलमध्ये एवढी दरवाढ झालीच नव्हती त्याचे परमोच्च स्थान भाजप सरकारने गाठले आहे. दरवाढ कमी झाली नाहीतर भाजीपाल्यासह सर्वच वस्तू महागणार आहेत. या चार वर्षामध्ये सरकारने जनतेला संकटामध्येच टाकल्याचे नवले यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)