इंधन जीएसटीत घालण्यात तेलंगणाचा विरोध

हैदराबाद – पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा समावेश जीएसटीत करावा अशी मागणी जोर धरू लागली असतानाच तेलंगणा राज्याने मात्र त्याला विरोध दर्शवला आहे. इंधनाचा समावेश जीएसटीत केला तर राज्य सरकारांना मोठेच नुकसान सोसावे लागेल असे तेलंगणाचे अर्थमंत्री एटला राजेंद्र यांनी म्हटले आहे. राज्य सरकारांना बहुतांश निधी इंधनावरील करांमधून मिळतो.

राज्यांनी त्या महसुलावर पाणी सोडायचे ठरवले तर त्याची भरपाई कशी होणार हे पहाणे महत्वाचे आहे. केंद्राकडुन जर त्याची भरपाई होणार नसेल तर इंधन जीएसटीत आणण्याच्या प्रस्तावाला आमचा विरोध राहील असे त्यांनी म्हटले आहे. मद्य आणि इंधन हे जीएसटी बाहेरच ठेवले पाहिजे असे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले आहे. इंधनाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने त्यावरील उत्पादन शुल्क कमी केले पाहिजे अशी सुचनाहीं त्यांनी केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)