इंधन जीएसटीत आणा !, कॉंग्रेसची पुन्हा मागणी

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत केंद्र सरकारने केलेली अडीच रूपयांची कपात हा केवळ पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मतदारांना देण्यात आलेला लॉलीपॉप आहे. त्यातून लोकांचे समाधान होणार नाही. त्यापेक्षा केंद्र सरकारने इंधनाच्या किंमती जीएसटीत आणून लोकांना दिलासा देण्याची गरज आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसने केले आहे. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की केंद्र सरकारने गुरूवारी किंमती केल्यानंतर त्या आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. हा लोकांना फसवण्याचाच प्रकार आहे असे ते म्हणाले. इंधनाच्या किंमती सरकारच्या हातात नाहीत असे ते म्हणतात मग कर्नाटक निवडणुकीच्या काळात इंधनाची दरवाढ त्यांनी 17 दिवस रोखून कशी धरली होती असा सवाल त्यांनी केला. निवडणुकांसाठी तुम्ही जर इंधन दरवाढ रोखून धरू शकता तर सामान्यांना दिलासा देण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात रोखता येणे तुम्हाला अशक्‍य आहे काय असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)