इंधन गळतीमुळे कोलकाता विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग

कोलकाता (पश्‍चिम बंगाल): कोलकाता विमानतळावर इंधन गळतीमुळे एयर इंडियाच्या एका विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. शनिवारी रात्री 10.35 वाजता ही घटना घडली. एयर इंडियाचे हे विमान बॅंकॉकहून दिल्लीला जात होते. बॅंकॉकहून रात्री 9.30 वाजता एयर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक बॅंकॉक-दिल्ली एआय-335 ने (ए320 निओ विमान) उड्डाण केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार मात्र तासाभरातच त्याची इंधन गळती सुरू झाल्याच्या शंकेने गोंधळ माजला. कोलकाता विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. विमानात 150 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रवाशांना नंतर रात्री 2.30 वाजता मुंबई-कोलकाता विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले.
इंधन गळतीमुळे कोलकाता विमानतळावर काही काळ इमर्जन्सी लागू करण्यात आली होती..


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)