इंधन दरवाढीने नागरीकांना दिलासा नाहीच
नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेकडून होत आहे पण सरकारने त्यास पुन्हा नकार दिला आहे. महसुलात घट होईल असा कोणताही निर्णय घेण्याची देशाचा आर्थिक स्थिती नाही त्यामुळे ही कपात करता येणार नाही असे एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

डॉलरच्या किंमती वाढून रूपयाच्या किंमती रोज घसरत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चा तेलाची आयात करणे दिवसेंदिवस महाग ठरत आहे. अशा स्थितीत उत्पादन शुल्कात कपात केली तर चालू खात्यावरील तूट प्रचंड वाढू शकते त्यामुळे सरकारला हे करणे शक्‍य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. दरम्यान आजही पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 16 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 19 पैसे वाढ झाली.

ऑगस्टच्या मध्यापासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तेव्हा पासून आत्तापर्यंत पेट्रोलचे दर 2 रूपये 17 पैशांनी तर डिझेलचे दर 2 रूपये 62 पैशांनी वाढले आहेत. या घडामोडींवर चिंता व्यक्त करताना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की इंधनावर मोठ्या प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जाते. नागरीकांना दिलासा द्यायचा असेल तर उत्पादन शुल्कात कपात करण्याखेरीज सरकारपुढे पर्याय नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)