इंधनावरील अन्याय्य कर व अधिभार तात्काळ कमी करा! : अशोक चव्हाण

मुंबई: सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता इंधनावरील अन्याय्य कर व अधिभार तात्काळ कमी करावेत, अशी मागणीही करतानाच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसने पुकारलेला भारत बंद महाराष्ट्रात 100 टक्के यशस्वी झाल्याच्या दावा केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडले.

आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधीत करताना ते बोलत होते. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदमुळे सरकार घाबरले आहे. या आंदोलनात सहभागी होणाछया कॉंग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकत्र्यांना नोटीसा देऊन काल रात्रीपासूनच स्थानबध्द करण्यात आले. पण सरकारच्या या दडपशाहीला झुगारून कार्यकर्ते व नागरिकांनी हा बंद यशस्वी केला. हे आंदोलन यशस्वी करणारे कार्यकर्ते आणि आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करणाछया व्यापाछयांचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आभार मानले.

आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी आशिष दुआ, कोल्हापूरात आ. सतेज पाटील, चंद्रपूरमध्ये आ. विजय वडेट्टीवार, पुण्यात हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे व अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, तर औरंगाबादमध्ये सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

सरकार चालवण्यात मोदी अपयशी
पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणे आमच्या हातात नाही, हे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे विधान म्हणजे केंद्र सरकारने महागाई कमी करण्याबाबत हात वर केल्यासारखेच आहे. सरकार चालवण्यात मोदी साफ अपयशी ठरले आहेत. हे सरकार पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर कमी करू शकत नाही, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असा हल्लाबोल करून अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली.

शिवसेना सत्तेसाठी लाचार
सत्तेसाठी लाचार असल्याने शिवसेना आजच्या बंदमध्ये सहभागी झाली नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या जनसामान्यांपेक्षा शिवसेनेला सत्ता आणि मंत्रीपदे अधिक महत्त्वाची आहेत. शिवसेना फक्त तोंडपाटीलकी करते. त्यामुळेच ‘वाघ आता डरकाळ्या फोडत नाही, तर भुंकतो’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)