इंधनाचे दर आवाक्‍यात ठेवण्यास सरकार अपयशी

जुन्नर- पेट्रोल व डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या असून या किमतींवर अंकुश ठेवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केली. जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारकडून होणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, यावेळी बेनके बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तहसील कार्यलयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठया संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बेनके म्हणाले की, सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात केंद्र शासनाने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. सरकारने तातडीने इंधनाचे दर आटोक्‍यात आणावेत, अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा बेनके यांनी यावेळी दिला. यावेळी जुन्नर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष धनराज खोत, युवक अध्यक्ष सुरज वाजगे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, नगरसेवक भाऊ कुंभार, अलका फुलपगार, बाळासाहेब सदाकाळ, दशरथ पवार, सुजाता डोंगरे, शोभा शिंदे, आरती ढोबळे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)