इंधनदरवाढ आजपासून लागू होणार

पुणे – इंधन दरवाढीमुळे देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ही दरवाढ रोखण्यात शासनाला अपशय येत असल्याचे दिसून येत आहे. सलग अकराव्या दिवशीही म्हणजे गुरुवारीही दरात वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाली आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू होणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्याने इंधनाच्या दरात वाढ होत असली तरी त्यावर उपाययोजना म्हणून शासन इंधनावर लावलेले कर कमी करुन थोड्या फार प्रमाणात दरवाढ कमी करु शकते. पण अद्याप केंद्र शासनाकडून याबाबत बैठका घेण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग निवडलेला नाही दुसरी कडे मात्र इंधनाचे दररोज वाढताना दिसत आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलत असतात. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेट्रोलचे दर काय असणार आहेत याची माहिती आदल्या दिवशी रात्री पेट्रोल पंप चालकांना कळते. त्याप्रमाणे उद्या म्हणजे शुक्रवारी पुण्यात पेट्रोलचा दर हा 85 रुपये 48 पैसे राहणार आहे तर डिझेलचा दर हा 71.93 इतका राहणार आहे. गुरुवारी हा पेट्रोलचा दर पुण्यात 85 रुपये 13 पैसे इतका होता तर डिझेलचा दर हा 71.70 पेैसे इतका होता. त्यानुसार पेट्रोलच्या दरात आज 35 पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात 23 पैशांनी वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)