इंधनदरवाढीचा साताऱ्यात निषेध

वाहतूक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा -गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढी मोठा उच्चांक गाठला असून ही पेट्रोलच्या किंमती 86 तर डिझेलच्या किंमती 73 रुपयांपर्यत जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे राज्य तसेच केंद्र शासनाविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असून साताऱ्यातही गुरुवारी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ वाहतूक संघटांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टॅंकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने गुरुवारी शहरातून इंधन दरवाढीविरोधात प्रकाश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये विविध वाहतूक संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी “डिझेल, पेट्रोलचे भाव कमी करा’, “टोलनाक्‍यांची गुंडगिरी बंद करा’, “इन्शुरन्स टीपीपी कमी करा’ यासह विविध घोषणांनी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला. यावेळी सरकारचा निषेध करत इंधनदरवाढीचे भाव कमी करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)