इंधंनाचे दर कमी झाल्याने भारताला मिळाला दिलासा 

रुपयाच्या मूल्यांतही भरीव सुधारणा 

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून क्रुडचे दर वाढल्यामुळे भारताच्या आणि ग्राहकांच्या ताळेबंदावर परिणाम झाला होता. आता तेलाची मागणी कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात तेलाचे दर 4.37 टक्‍क्‍यांनी कमी झाल्यामुळे ग्राहकाना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज जागतिक बाजारात तेलाचे दर 76.24 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले. भारताला गरजेच्या 80 टक्‍के तेल परकीय चलन वापरून खरेदी करावे लागते. त्यामुळे भारतातील परकीय चलनाचा साठा कमी होऊन रुपयाच्या मूल्यावर परिणाम होतो. सध्याच्या दरावर भारताला क्रुडचे दर परवडतात. मात्र, यापेक्षा दर वाढल्यानंतर त्याचा भारताच्या चलनावर परिणाम होतो, असे विश्‍लेषकांनी सांगितले. क्रुडचे दर कमी झाल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम लगेच शेअरबाजार
निर्देशांकांवर आणि रुपयाच्या मूल्यावर झाल्याचे दिसून आले. आज रुपयांचा भाव प्रति डॉलरला 41 पैशांनी वाढून 73.16 रुपये प्रति डॉलर या पातळीवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)