इंद्रा नुई पेप्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडणार 

न्यूयॉर्क: इंद्रा नुई पेप्सीको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार 3 ऑक्‍टोबर रोजी सोडणार आहेत. त्या कंपनीच्या चेअरमदपदावर मात्र 2019 च्या सुरुवातीच्या काही महिन्यापर्यंत राहणार आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुई यांच्या काळात कंपनीने सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. नुई यांच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रॅमोन लगुर्टा येणार आहेत. त्या म्हणाल्या की, आपण भारतात शिक्षण घेत होतो त्यावेळी आपण एवढया मोठ्या कंपनीचे नेतृत्व करू शकू, असे कदापी वाटले नव्हते.

12 वर्षांच्या काळात आपण कंपनीला विविध क्षेत्रांत पुढे नेण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या उत्पादनांची संख्या वाढली आहे. त्याबरोबरच कंपनीचा महसूल वाढला आहे. कंपनीने पर्यावरणाची कमी हानी होईल याकडे लक्ष दिले, असे त्या म्हणाल्या. मात्र या मोठ्या बदलाचे कारण कोणीही सांगितलेले नाही. त्यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात कंपनीचा महसूल 35 अब्ज डॉलरवरून 63.5 अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे. तर कंपनीच्या शेअरचे भाव 162 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. या काळात कंपनीने 79 अब्ज डॉलरचा लाभांश वितरित केला असल्याचे त्यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)