इंद्रावण या फळाचा उपयोग काय आहे? 

   सुजाता गानू

इंद्रावण हे फारसे माहीत नसलेले आयुर्वेदीय फळ आहे. हे मोठे घरगुती औषध आहे. हे फळ बाजारात फार कमी ठिकाणी पहायला मिळते.

मासिकपाळी रक्‍तस्राव योग्य प्रमाणात येण्यासाठी – स्त्रियांना अंगावर कमी जास्त प्रमाणात जात असते. अतिरक्‍त स्राव तसेच कमी रक्‍तस्राव दोन्हीही वाईटच. पण इंद्रावण या फळाचे चूर्ण मासिक पाळीच्या आधी आठ दिवस 125 मिली ग्रॅम शुद्ध गोमुत्रातून घ्यावे. विटाळ साफ होतो.

लहान मुलांचे पोट अकारण उडते अशावेळी – लहान मुलांचे उदर म्हणजेच पोट अचानक उडू लागते. माता हे पाहून घाबरते. पण जर इंद्रावण या वनौषधीच्या फळाचे चूर्ण गोमुत्रामधून चाटवावे. गोमूत्र हे शुद्ध असणे गरजेचे आहे.

मूत्र रोगांवर- लघवीस व परसाकडे साफ होऊन रोग बरे करणारे असते इंद्रावण. लहान मुलाच्या मूत्ररोगांवर याच्या फळाचे चूर्ण शंभर ते दोनशे मिलिग्रॅम गोमूत्रातून द्यावे.

रक्तगुल्मासारख्या गंभीर आजारात- रक्तगुल्मा झाला असता रिठ्याचे पाण्यात इंद्रावण फळ उगाळून द्यावे. गुल्म बरा होतो.

स्त्रियांच्या स्तन रोगावर उपयुक्‍त- कसल्याही प्रकारचा स्तनरोग मग गाठ असो नाही तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची सुरुवात असो, इंद्रावणचे फळ उगाळून वरून गाठीवर लावल्याने रोग बरा होतो. याच्या फळाचे चूर्ण गोमुत्रातून देतात.

कोठा साफ राहण्यासाठी- इंद्रावण हे मोठे रेचक औषध आहे. ह्याच्या फळाचे चूर्ण 200 ते 400 मिलीग्रॅम गोमूत्रातून, घेतल्यावर परसाकडे साफ होऊन कोठा साफ होतो.

जलोदरावर औषधी- कितीही मोठे जलोदर झाले असले तरी घाबरून जाऊ नये. इंद्रावणाच्या प्रभावी उपचाराने ते बरे होते, इतके इंद्रावणाचे फळ हे प्रभावी आहे. जलोदर झालेल्या मोठ्या माणसाने याच्या फळाचे अर्धा ग्रॅम चूर्ण रोज गोमूत्रातून घ्यावे. जलोदर बरे होते. मात्र, वैद्याच्या देखरेखीशिवाय मनाने हा उपचार करू नये.

वृषणवृद्धीवर- इंद्रावणाचे मूळ एरंडेल तेलात उगाळून प्यावे, यामुळे वृषणवृद्धी योग्य प्रकारे होते.प्रजननसमयी याचा फायदा होतो.

दंतरोगावर- दाताच्या विविध तक्रारींवर इंद्रावणाच्या फळाची धुरी दिल्याने सर्व दंतरोग बरे होतो.

केसातील उवांलिखांवर- केसातील उवांलिखांचा नाश होण्यासाठी इंद्रावणाचे मूळ अतिशय उपयुक्‍त आहे. याचे मूळ गोमूत्रात उगाळावे किंवा वाटून त्याचा लेप केसांवर लावून तीन तास ठेवावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)