इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतील विद्यार्थ्यांकडून केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

प्रभातफेरी काढत जमा केला पाच लाखांचा निधी

तळेगाव स्टेशन – केरळमध्ये उद्‌भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे. तेथील सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय, बी. फार्मसी, डी. फार्मसी महाविद्यालय, कांतीलाल शहा विद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत पाच लाख रुपये निधी संकलन केले आहे. हा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात येणार आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरख काळोखे, सुरेश शहा, शैलेश शहा, निरूपा कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली होती. ही प्रभातफेरी तळेगाव दाभाडे, माळवाडी, वराळे, वडगाव मावळ, कामशेत या भागात काढण्यात आली. विद्यार्थी, शिक्षकांनी या परिसरातील दुकाने, बाजारपेठा, लहान-मोठे व्यापारी यांना पथनाट्याच्या माध्यमातून केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाने या आवाहनाला प्रतिसाद देत भरघोस निधी विद्यार्थ्यांकडे जमा केला.

पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्याचा निर्णय संस्थेमार्फत घेण्यात आला. त्याला सर्वसामान्यांसह छोटे-मोठे व्यापारी, विद्यार्थी, पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पाच लाख रुपये इतका निधी संकलित झाला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये मदतीची भावना निर्माण व्हावी, त्यांना समाजाबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी, हा उद्देश होता असे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी यावेळी सांगितले.

या प्रभातफेरीमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डी. फार्मसीचे प्राचार्य जी. एस. शिंदे, उपप्राचार्य एस. एस. ओव्हाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी सहभागी झाले होते. गोळा करण्यात आलेला पाच लाख रुपये एवढा निधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)