इंद्रायणी महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इंदोरी (वार्ताहर) – अस्पृश्‍यता ही कायद्याने नष्ट होत नसते, कायद्याने घालविता येत नाही. त्यासाठी डॉ बाबासाहेबांनी स्वतः सामुदायिकरित्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून ही अस्पृश्‍यता घालवून समाजापुढे आदर्श निर्माण केला, असे मत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या संस्थापक-अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या सदस्या स्नेहल बाळसराफ यांनी व्यक्‍त केले.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्था परिवाराच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा वसंतराव पवार, ऍड. मनोहर दाभाडे, प्रशासन विभागाचे सुबोध गरूड, प्रभाकर तुमकर, केशव सोनवणे, संभाजी हेंद्रे, रामभाऊ झाडखंडे आदी उपस्थित होते.
डॉ बाळसराफ म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तळेगाव हे अतुट नाते आहे. तळेगावमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. तळेगावकर काही अंशी भाग्यवान आहे, तर बऱ्याच अंशी दुर्दैवी म्हणावं लागेल. कारण आशिया खंडातील सर्वात मोठे वाचनालय तळेगाव दाभाडे येथे करण्याचा संकल्प होता. मात्र काळाच्या ओघात राहून गेले. साहेबांची वाचनसंस्कृती फार मोठी होती. एक वेळ फाटका शर्ट घातला तरी चालेल, पण नवे पुस्तक, नवे विचार असायला पाहिजे असे बाबासाहेबांचे मत होते

स्नेहल बाळसराफ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर सर्वच घटकांसाठी काम केले आहे. घटना तयार करत राज्य घटनेचे निर्माते म्हणून बहुमोल कार्य केले. त्यासाठी आपण त्यांचा विचार प्रवाह पुढे नेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी सर्व समाजाला बरोबर घेऊनच कार्य केले आहे. ते कार्य खरोखर दीपस्तंभासारखे आहे. प्रा वसंतराव पवार म्हणाले की, या महामानवाचे कार्य अजोड असून, त्यांची विचारसरणी घेऊनच समाजाने जीवन जगले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)