इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थीनींना “निर्भया’ कडून स्व-संरक्षणाचे धडे

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – मुली व महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी देहुरोड उप विभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर यांच्या निर्भया पथकाने मंगळवार दि. 29 ला इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थीनींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण दिले.

विद्यार्थीनींनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त भाग घेतला. आपल्याकडील बॅग, ओढणी, चप्पल या वस्तूंपासून स्व-संरक्षण करण्याचे कराटे शिक्षक विजय फरगडे यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी मुली व महिला अत्याचार कायद्यांविषयी माहिती दिली. महाविद्यालयात महिंद्रा सीआयई ग्रुपच्या वतीने निर्भया तक्रार पेटी लावण्यात आली आहे. या पेटीत मुलींनी आपल्या तक्रारी टाकाव्यात. त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. तातडीची आवश्‍यकता असल्यास महिला तक्रार निवारण कक्ष 1091 वर संपर्क साधावा.

प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, संदीप पानसरे, सागर गावडे, प्रदीप चौ घुले, साधना विद्यालयाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक व विद्यार्थीनी यावेळी उपस्थित यावेळी होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)