इंद्रायणी नदीवरील “केटी’ला गळती

मोशी-चिंबळी हदीतील स्थिती : बंधाऱ्याच्या मोरीला पडल्या भेगा

चिंबळी- मोशी (ता. हवेली) व चिंबळी (ता. खेड) हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला गळती लागली आहे. पाणी बंधाऱ्यात न थांबता पुढे वाहून जात असल्याने भविष्यात पाणी टंचाई भेडसावण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

या बंधाऱ्यांमुळे नदीच्या लगतच्या गावांची पाणी टंचाई, शेतीचा पाणीपुरवठा सुरळीत आहे;परंतु गळती होत असल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यंदा राज्यात दुष्काळाचे सावट आहे. दरम्यान, शेतीसाठी आवर्तन सोडल्याने इंद्रायणी नदी तुडंब भरली आहे. त्यातच दरवर्षीप्रमाणे हिवाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडवले जाते त्यामुळे या पाण्याचा शेतीसह जनावरांना मोठ्या प्रमाणात उपयोग होते. मात्र, या बंधाऱ्याला गळती लागल्याने त्यात पाणी थांबत नसल्याने आगामी तीन महिने त्रासदायक ठरण्याची चिन्हे गडद झाली आहेत.

दरम्यान, या बधाऱ्यांच्या मोऱ्यांच्या बांधकामाला भेगा पडल्याने पाणी वाहून जात आहे. काही खांबांच्या दगडी निखळल्या असून त्यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती तातडीने केली जावी व गळती थांबवावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

  • शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे या बंधीायाच्या दुरूस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.
    – एम. बी. गदादे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, मोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)