इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

वाकी- महाविद्यालयाला उन्हाळी सुट्टी असल्याने मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या निगडीच्या 20 वर्षीय तरुणाचा दमछाक होवून इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) दुपारी दोनच्या सुमारस चाकण जवळील येलवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील स्मशानभूमीलगत असलेल्या इंद्रायणी नदीपात्रात घडली. तर तरुणाचा पाण्यात बुडालेला मृतदेह सुदुंबरे गावच्या एनडीआरएफच्या जवानांनी पाणबुडीच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढला असून चाकण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे.

केतन राजेश गायकवाड (वय 20, रा. निगडी) असे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. ता संजय चिंतामण गायकवाड (वय 41, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केतन मित्रांसमवेत आज दुपारी दोनच्या सुमारास येलवाडी गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. पोहताना त्याची दमछाक झाल्याने तो पाण्यात बुडाला. बराचवेळ झाला तरी तो बाहेर येईना म्हणून याबाबतची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. केतनच्या नातेवाईकांनी येलवाडी गावचे पोलीस पाटील प्रदीप गायकवाड यांना याबबत कळविले असता हा प्रकार त्यांनी चाकण पोलिसांना कळविला. दरम्यान, सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या जवानांनी पाणबुडीच्या मदतीने केतनचा मृतदेह दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाण्याबाहेर काढला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चाकण ग्रामीण रुग्णालयात केतन गायकवाड याच्या मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव व त्यांचे अन्य सहकारी पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)