इंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने सोमवारी (दि. 19) रोजी सप्तशृंगी माता मंदिर इंद्रायणी कॉलनी येथे स्वामी जयंतीनिमित्त पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दुपारी 3 वाजता स्वामी समर्थ मंत्राचे हवन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्यास सुरवात झाली. सप्तशृंगी माता मंदिर, इंद्रायणी कॉलनी ते आनंदनगर वनश्री नगर, मनोहर नगर ते स्वामी समर्थ मंदिर स्वामी समर्थ नगर अशा मार्गे पालखी मार्गस्थ झाली. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्‍यांच्या आतिषबाजीत परिसरातील महिला, अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पालखी सोहळ्याचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, गणेश ढोरे, संतोष खांडगे, सुनीता काळोखे, सुभाष जाधव, आशिष खांडगे, वैशाली दाभाडे, अमृता टकले आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)