इंद्रायणी, आंबेमोहोर तांदळाचा बाजारात दरवळ

नाशिक गोठी, मावळ, कोकण, मुळशीतून तांदूळाची सर्वाधिक आव

पुणे- सुगंधीत, चवीला उत्तम असलेल्या इंद्रायणी आणि आंबेमोहोर तांदुळ मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. पुणेकर या दोन्ही तांदळास खाण्यास पसंती देत आहेत. यंदा राज्यातील सर्व तांदूळ उत्पादक पट्ट्यांमध्ये या तांदळाचे चांगले उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात तांदूळाच्या उत्पादनात सुमारे 5 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेल्या परीक्षा आणि इतर काही कारणांमुळे बाजारात तांदळाला मागणी कमी आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
चवीला गोड आंबेमोहोरप्रमाणेच सुगंधित खाण्यास मऊ अशी वैशिष्टये असलेल्या या इंद्रायणी तांदळाचे बाजारातील स्थान हळूहळू उंचावत आहे. गेल्या सात ते आठ वर्षात या तांदळाच्या मागणीत वाढ होत असल्याने त्याचे लागवडीचे क्षेत्रही वाढत आहे. राज्यातील नाशिक गोठी परिसरात मोठ्या प्रमाणात इंद्रायणीचे उत्पादन घेतले जाते. त्यासह जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, नसरापूर, कोल्हापूर पट्ट्यातही इंद्रायणी पिकविला जातो. सध्यस्थितीत इंद्रायणी तांदूळाला पुणे शहरासह नगर, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई येथूनही मागणी आहे. राज्यातील हवामान हे इंद्रायणीसाठी पोषक आहे. तसेच, इतर जातींच्या तुलनेत इंद्रायणीस रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी इतर जातीच्या भाताची लागवड कमी करून इंद्रायणीची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. राज्यात पावसाचे जास्त प्रमाण असलेल्या जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील पट्ट्यात या तांदळाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. तेथून हा तांदूळ बाजारात दाखल झाला असून इंद्रायणीच्या प्रतिक्विंटलला 3 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये तर आंबेमोहोरच्या प्रतिक्विंटलला 5 ते 7 हजार रुपये भाव निघाला आहे. तर किरकोळ बाजारात इंद्रायणीच्या प्रतिकिलोस 40 ते 50 तर आंबेमोहोरला 50 ते 70 रुपये भाव मिळत आहे. दरम्यान, राज्यातील बरेचसे शेतकरी तांदूळ केवळ घरात खाण्यासाठी उत्पादन घेतात. काही शेतकरी राईस मिलला किंवा खासगी व्यापाऱ्यांना तांदूळ विकतात. तर काही शेतकरी शहरातील नातेवाईक, किरकोळ ग्राहकांना तांदळाची विक्री करतात. याविषयी व्यापारी कुणाल ओस्तवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मार्केट यार्डातील भुसार विभागात राज्याच्या विविध विभागातून दररोज सुमारे 20 टन इंद्रायणी तांदळाची आवक होत आहे. तर, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथून 20 टन आवक होत आहे. तर इंद्रायणी खालोखाल आंबेमोहोरचेही बाजारात चांगली आवक होत आहे. सुगंधीत आंबेमोहोर खाण्यास पुणेकर पसंती देत असल्याची व्यापारी विजय मुथा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)