“इंद्रायणी’ला पुन्हा ब्रेक

रेल्वेलाइन दुरुस्तीसाठी 15 दिवस सेवा बंद
– अनेक रेल्वेंचे मार्ग बदलले; सोलापूर पॅसेंजरही रद्द

पुणे,दि.31 -चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रुळावर आलेल्या इंद्रायणी एक्‍सप्रेसला एक महिन्याच्या आत पुन्हा पंधरा दिवसांचा ब्रेक मिळाला आहे. सोलापूर मार्गावर होणाऱ्या दुरुस्तीसाठी काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात इंद्रायणी एक्‍सप्रेसचा समावेश आहे.

माढा-वडशिंगेदरम्यान दुहेरीकरणाच्या कामामुळे पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्‍स्प्रेस, सोलापूर-मिरज एक्‍स्प्रेस आणि पुणे-सोलापूर पॅसेंजर 15 दिवस धावणार नाहीत. मध्य रेल्वे विभागातील दौंड-सोलापूर सेक्‍शनदरम्यान दुहेरीकरणाचे काम 1 एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर दरम्यान धावणारी इंद्रायणी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर-सोलापूर आणि सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-मिरज व मिरज-सोलापूर या एक्‍स्प्रेस गाड्यादेखील 15 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-कन्याकुमारी एक्‍स्प्रेस फक्त 7 एप्रिलला रद्द करण्यात आली आहे. कन्याकुमारी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस 9 एप्रिलला एका दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. त्यासोबत अनेक एक्‍स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्यांचे ‘शॉर्ट टर्मिनेशन’ केले आहे.
दरम्यान, यापूर्वी जेऊर ते वाशिंबे या स्थानकादरम्यान रुळाखालील खडी बदलण्याच्या कामामुळे 1 नोव्हेंबर 2017 पासून 6 मार्च 2017 पर्यंत इंद्रायणी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली होती. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर रुळावर आलेल्या इंद्रायणी एक्‍स्प्रेसला एक महिन्याच्या आत पुन्हा 15 दिवसांचा ब्रेक लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)