इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

इंदोरी – आध्यात्मिक महत्त्व लाभलेली आणि दूरचा प्रवास करत असताना आपल्या दोन्ही किनाऱ्यावरील जमीन सुजलाम सुफलाम करणाऱ्या इंद्रायणी नदीच्या नशिबी मात्र दूरवस्था आली आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाढत्या प्रदुषणाने नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कित्येक ठिकाणी जलपर्णीच्या विळख्यात अडकलेल्या इंद्रायणीचा प्रवाह आता काळवंडू लागला आहे.

-Ads-

केवळ जल आणि जीवनच नव्हे तर पर्यटनाच्या ही संधी देणाऱ्या इंद्रायणीकडे साफ दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. यामुळे जे पाहण्यासाठी ते पर्यटक येत असत ते ठिकाण देखील जलपर्णींत अडकले आहे. पर्यटन स्थळ म्हणून प्रख्यात असलेले कुंडमळा मावळ परिसरात इंद्रायणी प्रदूषित झालेली दिसून येत आहे. या ठिकाणी मोठ मोठे रांजण खळगे आहेत. हे रांजण खळगे पाहण्यासाठी पर्यटक दुरून येत असत, तसेच या परिसरात येणारे पर्यटक रांजण खळगे अवश्‍य पाहत असत. परंतु आता या ठिकाणी आता सर्वत्र जलपर्णीचा विळखा पडलेला दिसून येत आहे.

येथे असलेल्या बंधाऱ्यावरुन पाण्याचा प्रवाह जात नसून, खालून पाईपद्वारे पाणी सोडले जात आहे. जलपर्णीने प्रवाहाच्या वेगाला ही मर्यादा घातल्या आहेत. याचाच फायदा घेत बंधाऱ्याच्या कठड्यावरुन चक्‍क चारचाकी वाहनांची देखील वाहतूक होत असताना दिसून येत आहे. या धोकादायक वाहतुकीला ही कोणी प्रतिबंध घालताना दिसत नाही. या मार्गाने परिसरातील ग्रामस्थ धोका पत्करुन वाहने घेऊन जाताना सर्रास दिसून येतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)