“इंद्रायणी’ने सोडला काठ ; आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याची नोंद

श्रावण धारांसह धरणांतून सोडले पाणी

आळंदी: आळंदी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून श्रावण धारा बरसत आहेत. तर आंद्रा आणि वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू असल्याने आळंदी हद्दीतून वाहणारी इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, पावसाळ्यात दरवर्षी इंद्रायणी नदीत एक तरी बळी जातोच मात्र, यंदा आतापर्यंत तीन जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

-Ads-

गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या व अधुन-मधुन हुलकावणी देणाऱ्या वरूण राजाने शुक्रवार (दि. 17) पासून बरसण्यास सुरुवात केल्याने आळंदीकरांना तीन दिवसांपासून सूर्य दर्शन झालेले नाही. त्यातच मावळात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांतून विसर्ग सुरू असल्याने इंद्रायणीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. तर या पावसाळी हंगामात इंद्रायणीने तीनवेळा काठ सोडला असून ती खळखळून वाहू लागली आहे. तर पावसाळी हंगामात दरवर्षी इंद्रायणीत एकतरी बळी घेतला जातो. ही परंपरा कायम ठेवीत यंदा तिघेजण वाहून गेल्याची नोंद झाली आहे. सलग तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मध्यम व हलक्‍या पावसाने शेतकरी वर्गात जरी समाधान असले तरी येथील नियमित होणारे दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले आहेत.

पाऊसाळा म्हटले की घसरा-घसरी, चिखल-खड्डे आले. त्यातच आळंदीतील 50 टक्के रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे झाले खरे; परंतु साईडपट्ट्यावरील माती रस्त्यावर आल्याने अनेक दुचाकीस्वार यावरून घसरून पडुन दुखापतीस सामोरे गेले आहेत. त्यासाठी पालिकेने भर पावसात रस्ते धुण्याची योजना एक दिवस राबली; परंतु परिस्थिती जैसे थे झाल्याने त्यांनी ही योजना गुंडाळून टाकली.

नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा

इंद्रायणी दुथडी भरून वाहु लागल्याने इंद्रायणी घाटावर असणाऱ्या संत माहत्म्यांच्या समाध्या, भक्‍ती-सोपान पूल, भक्‍त पुंडलिकाचे अर्धे मंदिर, अस्थी कुंड पाण्याखाली गेल्याने येथील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तर नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आळंदी (ता. खेड) : येथे गेल्या तीन दिवसांपसून श्रावण धार बरसत असून मावळातील धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)