“इंद्रायणी’ने घेतला मोकळा श्‍वास

प्रभात प्रभाव : “आरएसएस’च्या स्वयंसेवकांनी केली नदी पात्राची स्वच्छता

नाणे मावळ – कामशेतच्या इंद्रायणी नदी पात्रातील प्रदूषणाचे छायाचित्र 25 फेब्रुवारी रोजी दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. या छायाचित्राची दखल घेत कामशेतमधील सुशिक्षित नागरिक एकत्र आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“प्रदूषित इंद्रायणी’ या प्रमुख मुद्‌द्‌याखाली छायाचित्र प्रसिद्ध झाले. सुशिक्षित तरुणांनी इंद्रायणी मातेच्या रक्षणासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले. संघाच्या स्वयंसेवकांनी दिलेल्या हाकेला अनेकांनी प्रतिसाद दिला.

सुमारे 40 तरुणांनी एकत्र येऊन, रविवारच्या सुट्‌टीच्या दिवशी इंद्रायणीचे नदीपात्र स्वच्छ करण्यास सुरुवात केली. देशात सुरू असलेल्या “स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या अभियानाला सशक्‍त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे गरजेचे आहे, असे मत यावेळी तरुणांनी नोंदविले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी 25 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन टप्प्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याचा मानस यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी बोलून दाखविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)