इंद्रायणीत 9033 ज्ञानदिप अर्पण

आळंदी- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाइन ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित जागतिक परिषदेच्या’ अनुषंगाने ज्ञानतीर्थक्षेत्र आळंदी येथील पवित्र इंद्रायणी तीरावरील विश्‍वरूप दर्शन मंचावर तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे व पसायदानाला विश्‍वगीत म्हणून मान्यता मिळावी म्हणून पवित्र इंद्रायणीमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांएवढे, म्हणजेच 9033 ज्ञानदीप मान्यवरांच्या हस्ते व 700 मृदंग वादकांच्या गजरात अर्पण केले गेले.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, बी. व्ही. जी ग्रुपचे संचालक हणमंत गायकवाड, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल, इटालीचे माजी राजदूत डॉ. बसंत गुप्ता, महान शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र थत्ते, प्रसिद्ध कायदे पंडित ऍड. शिराज कुरेशी, थाइलॅंड येथील बुद्धचरणदास, धर्मालंकार स्वामी राधिकानंद सरस्वती, तुळशीराम कराड, काशीराम कराड, डॉ. मंगेश कराड, डॉ, सुनील कराड, ज्योती कराड-ढाकणे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, पं.उद्धवबापू आपेगावकर व सुदाम महाराज पानेगांवकर उपस्थित होते. तसेच यावेळी हजारों वारकरी, मृदंगवादक, टाळकरी उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले, 21 व्या शतकातील सर्वात मोठा प्रश्‍न मी कोण आहे हा आहे. याचा शोध घेण्यासाठी संत श्री ज्ञानेश्‍वरांच्या चरणी यावे लागते. या जगातील शेकडो समस्यांचे समाधान या तीर्थ क्षेत्रावर आल्यावर केले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे डॉ. विश्‍वनाथ यांनी जे स्वप्न पाहिले, ते संत श्री ज्ञानेश्‍वरांच्या नावाने जगप्रसिद्ध आधुनिक मंदिराचे निर्माण होय. तसेच, विज्ञान, धर्म व तत्वज्ञान या विषयांवरील परिषदेचे आयोजन केले आहे. अध्यात्माशिवाय विज्ञान कळणे अवघड आहे. जेव्हा आपले अंतःकरण शुध्द होईल, तेव्हाच सत्याचे दर्शन घडेल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अतुल कुलकर्णी तर प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

  • आळंदी हे ज्ञानतीर्थ आहे. येथे होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. वारकरी हे संपूर्ण श्रद्धेने अध्यात्मावर विश्‍वास ठेवतात; परंतु आमच्या सारख्या अर्धवट शिकलेल्या लोकांची मोठी समस्या असते. अशा वेळेस संत श्री ज्ञानेश्‍वर यांनी विश्‍वासाठी केलेली प्रार्थना ही संपूर्ण मानवजातीला किती महत्वपूर्ण आहे, हे लक्षात येते. त्यामुळेच त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटामुळे त्यांचे नाव संपूर्ण जगभर उच्च स्थानावर पोहोचले आहे. आता येथून संपूर्ण जगभर मानवतेचा व विश्‍व शांतीचा संदेश पोहोचविला जाईल.
    -प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, संस्थापक अध्यक्ष, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)