इंद्रायणीच्या बंधाऱ्याला तडा जाण्याची शक्‍यता

चिंबळी- इंद्रायणी नदी पात्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीला पुर आल्याने पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील जलपर्णी पुराच्या पाण्याबरोबर वाहून आली आहे, त्यामुळे मोशी-चिंबळी हद्दीत असलेल्या इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्याला अडकली आहे. अडकलेली जलपर्णी हजारो टनांच्या आसपास असल्याने त्याचा नदीवरील सिमेंट बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यास जलपर्णीचा दबाव निर्माण होऊन सिमेंट बंधाऱ्याला तडे जाऊन बंधारा तुटण्याची शक्‍यताही नाकरता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.
तळवडेपासून मोशी घाटापर्यंतची अंदाजे दहा किलोमीटर नदी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून वाहते. या हद्दीअंतर्गत आलेली जलपर्णी पावसाळ्यापूर्वीच पालिकेच्या वतीने हटविण्याचे काम सुरू होते, यामुळे मोशी ते तळवडे नदी पात्र जलपर्णी मुक्त झाले होते. मात्र सध्याच्या पावसाने इंद्रायणीला पूर आल्याने पाण्याबरोबर जलपर्णी वाहून मोशी-चिंबळी बंधारा हद्दीत आली. जलपर्णीचा ढिग पाण्यात अडकून राहिल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेवरच प्रश्न उपस्थित राहिला आहे. तरी संभाव्य धोका ओळखून पालिकेने तात्काळ ही जलपर्णी काढून टाकावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे;
गेले आठ दिवस पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणीला पूर आल्याने मोशी घाटावरची जलपर्णी संपूर्ण खाली वाहून आली ती तशीच पुढे न सरकता आल्हाडवाडी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यावर अडकून पडली असल्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला असल्याचे पाहणीत दिसून येत आहे. येथे जलपर्णी पात्राबाहेर काढण्याचे काम सुरू असले तरी मनुष्यबळाअभावी काम संथ गतीने सुरू असून हे काम तात्काळ व्हावे जेणे करून बंधारा सुरक्षा अबाधित राहील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)