इंद्रायणीच्या पात्रात खळखळले पाणी

आळंदी- इंद्रायणी नदीतील पाणी प्रवाह बंद झाल्याने आळंदीत पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नदीत पाणी सोडण्यात आल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.
आळंदी नगरपरिषद पाणी साठवण बंधाऱ्यात पाण्याची पातळी खालावल्याने पिण्याचे पाण्यासाठी इंद्रायणी नदीत पाणी सोडण्याची मागणी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केली होती. देहू येथील इंद्रायणी नदी पात्रात देखील पाणी सोडण्याची मागणी देहूतील रानजाई प्रकल्पाचे सोमनाथ आबा मुसुडगे यांनी केली होती. त्यांनी पाटबंधारे विभागात पाठपुरावा केला. त्यास यश आले असून इंद्रायणीच्या पात्रात पाणी खळखळल्याने भाविकांच्या स्नानाची सोय झाली. इंद्रायणी नदीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेने डी. पी. आर केल्याने प्रदूषणाचा प्रश्‍न देखील सुटणार आहे. इंद्रायणी नदीत पाणी सोडल्याने पिण्याचे पाण्याची, शेतीला पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, नदी पात्रात पाणी सोडल्याने पाणी पुरवठा केंद्रातील पाण्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यावरील ताण कमी होणार असल्यचे गिलबिले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)