इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळला

शीना बोरा हत्याकांड प्रकरण
मुंबई – हायप्रोफाइल शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. इंद्राणी मुखर्जी आपली मुलगी शीना बोराच्या हत्या प्रकरणात सध्या मुंबईच्या भायखळा कारागृहात आहेत.

या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला 2015मध्ये अटक करण्यात आली होती. 24 एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. 2015 मध्ये या हत्येचा खुलासा झाला होता. तेव्हा इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला हत्यारे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. इंद्राणीवर आरोप आहे की, तिने आपला आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर 25 एप्रिल रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

इंद्राणीने आपले वकील गुंजन मंगला यांच्याद्वारे विशेष सीबीआय न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जात इंद्राणीने म्हटले होते की, भायखळाच्या महिला तुरुंगात आपल्या जीवाला धोका आहे. यासाठी तिने दोन उदाहरणे देखील यात दिली होती. यामध्ये औषधांच्या ओव्हरडोसमुळे अर्धवट बेशुद्धावस्थेत तिला 6 एप्रिल रोजी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, याचा दाखला दिला आहे.

यावेळी तिच्या काही महत्वाच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मेंदूच्या एमआरआयचाही समावेश होता. यावेळी रुग्णालयाने सांगितले होते की, जी औषधे तिला डॉक्‍टरांकडून लिहून देण्यात आली नव्हती ती औषधे तिने घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)