इंदोली जलसिंचन योजनेची उंची वाढविण्याची जबाबदारी माझी : ना.बानुगडे-पाटील

उंब्रज – इंदोली ता. कराड येथील बंद असलेली पाल व इंदोली जलसिंचन योजनेची कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी पाहणी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. तर पंधरा दिवसात प्राथमिक स्वरुपात योजनेचे पाणी सुरू होणार असल्याचे सांगून 100 मीटर हेड पाण्याची उंची वाढवण्यासाठी लवकरच महामंडळाला प्रस्ताव सादर केला जाईल व तो मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी असेल असे नितीन बानुगडे- पाटील यांनी ग्वाही दिली.

इंदोली ता. कराड येथील पाल व इंदोली जलसिंचन योजना पाहणी तसेच शेतकऱ्यांशी संवाद अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासराव निकम, सुनील पाटील, हर्षल कदम यासह योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकरी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंदोली ता. कराड येथे उभारण्यात आलेल्या इंदोली जलसिंचन योजना ही 2013 साली कार्यान्वित झाल्यापासून बंद अवस्थेत आहे. या योजनेच्या उपसा पंपग्रहाला भेट देऊन सदर योजनेबाबत कार्यकारी अभियंता शशिकांत गायकवाड यांच्याकडून माहिती घेतली. तसेच चोरे परिसरात काढण्यात आलेल्या पाण्याच्या चेंबरची पाहणी करून कार्यकारी अभियंता गायकवाड यांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. शेतकरी संवाद कार्यक्रमात आनंदपूर, साबळवाडी, कोरीवळे, गोडवाडी,मांगवाडी, हिंगनोळे, इंदोली, वडगांव, शिरगाव, भांबे, चोरे, मरळी, धावरवाडी, यासह पाल जिल्हा परिषद गटातील असंख्य शेतकरी यांनी आपली पाणी प्रश्नाची व्यथा मांडली. तसेच ग्रामस्थांना योजने संदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी सदर योजनेचे पाणी मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर नोंद तसेच कसलाही बॉन्ड केला जाणार नाही. नव्याने पाणीवाटप संस्था निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी जो पाणी वापरणार तोच या संस्थेचा सभासद असणार आहे. पाणीपट्टी 1 हजार 200 रुपयाच्या आसपास असणार असून येणाऱ्या वीज बिलासाठी महामंडळ बिलाच्या रकमेत 81 टक्के भरणार तर शेतकऱ्यांनी फक्त 19टक्के रुक्कम भरायची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला वीज बिलाचा जादा भुर्दंड बसणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे पाणी मागणी करावी व जे कोणी अफवा पसरवून योजना बंद पाडण्याचे कुटील कारस्थान करतील अशांना शेतकऱ्यांनी हाणून पाडून सकारात्मक द्रष्टीने योजनेकडे पाहण्याची वेळ आली असून बाकीचे बोलून गेले असतील मी करून दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)