इंदोर-मनमाड रेल्वेसाठी 9 हजार कोटी रूपयांचा करार

नवी दिल्ली – केंद्र सरकारचे जहाज वाहतूक मंत्रालय, रेल्वे मंत्रालय यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारशी इंदोैर – मनमाड मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याच्या करारावर आज स्वाक्षऱ्या केल्या. हा प्रकल्प नऊ हजार कोटी रूपयांचा असून त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकार आर्थिक मदत करणार आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले की हा एक मोठा रेल्वे प्रकल्प आहे.

याद्वारे इंदोरहून रेल्वेने मालवाहतुकीचे कंटेनर मनमाडला येतील आणि तेथून ते जेएनपीटी बदंराकडे पाठवले जातील. या रेल्वे प्रकल्पामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या आदिवासी भागाला विकासाचा मोठा लाभ होईल अशी माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे मुंबई व पुण्याहून मध्यप्रदेशच्या या भागाचे अंतर सुमारे 170 किमीने कमी होईल. सध्या हा मार्ग 815 किमीचा आहे तो आता 644 किमीचा होईल असेही गडकरी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री पीयुष गोयल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हेही उपस्थित होते. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरही या प्रकल्पामुळे जोडला जाणार आहे असेही गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)